Want to Partnership with me? Book A Call

Popular Posts

Categories

Edit Template

न्यूट्स-जो स्वतःचे हृदय स्वतः बरे करतो..

अमेरिकेमध्ये असाच प्रयोग Red Spotted Newts वर करण्यात आला, मुद्दामहून न्यूट्स च्या हृदयावर जखम करण्यात आली, तीन महिन्यानंतर जे परिणाम आले, ते खरोखरच चकित करणारे होते. न्यूट्सचे हृदय पूर्णंपणे बरे झालेले होते. तिथे जखमेचा एक व्रण पण शिल्लक नव्हता. त्याच्या शरीरातील असे कुठले जनुक(Genes) त्याला याबाबत मदत करतात, याबाबत शास्त्रज्ञ अधिक संशोधन करीत आहेत.

बरेच न्यूट्स दिवसा सक्रिय असतात तर काही रात्री सक्रिय असतात. न्यूट्स मांसाहारी आहेत. ते जमिनीवरील किटक, किडे, पाण्यातील किडे आणि अंडी खातात. हा प्राणी अतीसंरक्षित प्रजाती मध्ये गणला जातो. पर्यावरणावर होत असलेल्या परिणामामुळे याच्या काही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

न्यूट्स हा उभयचर प्राणी असून पाणी आणि जमीन या दोन्ही ठिकाणी राहू शकतो. काहीसा पाल, सरडा आणि बेडूक यांच्याशी साधर्म्य असलेला हा प्राणी जेवढा निरुपद्र्वी दिसतो, तितकाच विषारी पण आहे. त्वचेमधून निघालेलं विष एका माणसाच्या मृत्यूला कारणीभूत ठरू शकते. प्रामुख्याने याचे वास्तव्य अमेरिका, युरोप, आणि आशिया खंडात आढळते. हा Salamandridae(सॅलॅमँड्रिडी) या जीवशास्त्रीय गटात मोडतो. सरडा आणि न्यूट्स यांच्या त्वचेमध्ये फरक आढळतो, सरडे तुकतुकीत त्वचेचे असतात, तर न्यूट्स खडबडीत त्वचेचे असतात. हे ८ इंच (20 सेंटीमीटर) पेक्षा लहान असतात आणि वजन 0.22 ते 0.37 औंस (6.3 ते 10.6 ग्रॅम) असते.

न्यूट्स प्राण्यामध्ये काही विशेष गुणधर्म आढळतात, जे त्याला इतर प्राण्यापासून वेगळ करतात. या प्राण्याचा तुटलेला अवयव जसाच्या तसा पुन्हा निर्माण होतो, आणि यामध्ये क्षतिग्रस्त पेशीच दुरुस्तीचे काम करतात. नेचर जर्नलमधील एका लेखानुसार न्यूट्स संपूर्ण हृदयाचे स्नायू, त्याच्या मज्जासंस्थेचे घटक आणि डोळ्याच्या पापणीसह संपूर्ण आपल्या शरीरातील कार्य करीत असलेले अवयव, आणि पेशीचे जसेच्या तसे निर्माण करू शकतात.

Share Article:

व्हाट्स अँप वर सब्स्क्राइब करा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2023-24 Marathisamwad.com