Want to Partnership with me? Book A Call

Popular Posts

Categories

Edit Template

चीनमध्ये बुलेट ट्रेन पेक्षा जास्त वेगाच्या ट्रेनची यशस्वी चाचणी, धावणार प्रतितास १००० किलोमीटर

चीन आपल्या तंत्रज्ञानामध्ये एवढा अग्रेसर आहे कि आता बुलेट ट्रेन पेक्षा जास्त वेगाच्या ट्रेन ची चाचणी आणि संशोधन चालू आहे. नुकताच ह्या देशामध्ये १००० किलोमीटर पेक्षा जास्त वेगाने धावणाऱ्या बुलेट ट्रेन ची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली.

चायना एरोस्पेस सायन्स अँड इंडस्ट्री कॉर्पोरेशन लिमिटेड (CASIC) हे तंत्रज्ञान विकसित केले असून हि ट्रेन एका व्हॅक्यूम ट्यूबमधून धावते. अल्ट्रा-हाय-स्पीड मॅग्नेटिक लेव्हिटेशन (मॅगलेव्ह) म्हणजे चुंबकीय तंत्रज्ञानावर ही ट्रेन आधारित असून १००० किलोमीटर प्रतितास वेगाने धावण्याची तिची क्षमता आहे. यासाठी उत्तर चीनच्या शांक्सी प्रांतामध्ये दातोंग शहरात एक सुपरकंडक्टिंग मॅग्लेव्ह लाइन चाचणीसाठी तयार करण्यात आली आहे. यापूर्वी व्हॅक्यूम ट्यूब शिवायही या ट्रेनची चाचणी घेण्यात आली, यावेळी ट्रेनचा वेग ६२३ किलोमीटर प्रतितास होता.

सध्या चीनमध्ये वेगाने धावणाऱ्या ट्रेनचा वेग हा ३२५ किलोमीटर प्रतितास आहे. CASIC मधील प्रकल्पाचे सदस्य ली पिंग यांनी सांगितले की एकदा ह्या ट्रेनच्या सर्व चाचण्यांचे परीक्षण झाल्यावर हांगझोऊ आणि शांघाय दरम्यान हि ट्रेन धावेल. यामुळे चीनच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात अवघ्या काही तासांत प्रवास करता येणार आहे.

Share Article:

व्हाट्स अँप वर सब्स्क्राइब करा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2023-24 Marathisamwad.com