Want to Partnership with me? Book A Call

Popular Posts

Categories

Edit Template

निसर्गसौंदर्याचा आनंद घ्यायचा आहे, नक्की भेट द्या पेरियार राष्ट्रीय उद्यानाला !

पेरियार राष्ट्रीय उद्यान हे सदाहरित जंगलामध्ये मोडते, आणि ते केरळ मध्ये पश्चिम घाटामध्ये वसलेले आहे. इडुक्की, कोट्टायम आणि पठाण या जिल्ह्यांचा बहुतेक प्रदेश या अभयारण्याने व्यापला असून,याचे एकूण क्षेत्रफळ १२३० चौरस किलोमीटर आहे. १८९५ साली या पेरियार तलावाची निर्मिती झाली कि जेणेकरून जवळपासच्या प्रदेशांचा पाण्याचा प्रश्न सुटेल. हे राष्ट्रीय उद्यान दुर्मिळ वनस्पती, अतिसंरक्षित प्राणी आणि वनस्पती यांचे आश्रयस्थान आहे. या तलावामुळेच येथील निसर्ग संपदा अबधित राहिली आहे. या उद्यानाला लागूनच पेरियार आणि पंबा नद्या वाहतात.

१९३४ साली चिथिरा थिरुनल बलराम वर्मा यांनी प्रथम हा प्रदेश राखीव जंगल म्हणून घोषित केला. त्याकाळी ह्या प्रदेशमध्ये चहाची शेती खूप प्रमाणात केली जात असे, आणि अप्रत्यक्षपणे जंगल प्रदेशामध्ये अतिक्रमण होत होते. १९५० साली स्वातंत्र्यानंतर हा प्रदेश अधिकृतपणे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला. १९७७ साली या अभयारण्यास व्याघ्र अभयारण्याचा दर्जा मिळाला. १९८२ साली हे जंगल राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले.

हा प्रदेश उष्णकटिबंधीय सदाहरित प्रदेशामध्ये मोडतो. गवताळ प्रदेश, पेरियार तलाव, पर्णपाती वनस्पती, निलीगिरी वनस्पती,आणि सतत वाहणाऱ्या नद्या यामूळे हा प्रदेश पर्यावरणीय परिसंस्था बनलेला आहे. येथे सुमारे गवताच्या १७१ प्रकारच्या प्रजाती आणि १४० प्रकारच्या ऑर्किड च्या प्रजाती आढळतात. येथे दाट हत्ती गवतासारखे गवत आढळते, आणि गवताळ प्रदेशही असल्यामुळे शाकाहारी प्राण्यांना मुबलक अन्नही प्राप्त होते.

स्रोत:विकिपीडिया

जंगलात सागवान, रोझवुड, टर्मिनलिया, चंदन, जकारंद, आंबा, जामुन, चिंच, पवित्र अंजीर, प्लुमेरिया, रॉयल पोकिनियाना, किनो ट्री, बांबू आणि एकमेव दक्षिण भारतात आढळणारे शंकूच्या आकाराचे, नागेशियन वॉलिचियाना वृक्ष आढळतात. हे राष्ट्रीय उद्यान वाघ आणि हत्तीसाठी राखीव असून इथे इतर सस्तन प्राण्यांमध्ये गौर, सांबर, वन्य डुक्कर, शेकरू, त्रावणकोर उडणारी खार, जंगली मांजर, आळशी अस्वल, नीलगिरी थेर, सिंहमुख माकड, नीलगिरी लंगूर माकड ,वटवाघळ, Salim Ali’s fruit bat या नावाचे दुर्मिळ वटवाघुळ, पट्टेरी मानेचा मुंगूस आणि नीलगिरी मार्टेन यांचा समावेश आहे.

स्रोत:विकिपीडिया

पेरियार राष्ट्रीय उद्यान हे अनेक जातीच्या पक्ष्यांचे आश्रयस्थान आहे. येथे एकूण २८० प्रकारच्या पक्ष्यांच्या जाती आढळून येतात. प्रामुख्याने मलबारी राखी, धनेश, निलगिरी, वूड पिजन, निलगिरी कस्तूर, तिरंदाज ग्रेट हॉर्नबिल, छोटे स्पायडर हंटर, ब्राम्हणी घार, काळी मान सारस, आणि बेडूक तोंड्या ह्या जातीचे पक्षी दिसून येतात.

कुमिली हे पेरियार राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेले शहर आहे, आणि अंतर केवळ ४ किमी आहे. कोट्टायम रेल्वे स्थानक १०० कि.मी. वर, तर कोच्ची रेल्वे स्थानक १२० कि.मी. वर आहे. जवळचे विमानतळ मदुराई असून अंतर ११० कि.मी. आहे. ऑक्टोबर ते एप्रिल हा या उद्यानाला भेट देण्यास योग्य काळ असून पर्यटकांना राहण्यासाठी जवळच्या रिसॉर्ट, हॉटेल्स, आणि हाऊसबोट मध्ये चांगली सोय होऊ शकते.

स्रोत:विकिपीडिया

Share Article:

व्हाट्स अँप वर सब्स्क्राइब करा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2023-24 Marathisamwad.com