Want to Partnership with me? Book A Call

Popular Posts

Categories

Edit Template

10 कोटींचा गोलू-2 नावाचा रेडा… बनतोय चर्चेचा विषय

बिहारमधील डेअरी आणि कॅटल एक्स्पोमध्ये सध्या एक १० कोटींचा गोलू-२ नावाचा रेडा चर्चेचा विषय बनलेला आहे. मुर्राह जातीच्या या रेड्याला अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून कृषी प्रदर्शनामध्ये तो अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. या प्रदर्शनामध्ये देशभरातील शेतकऱ्यांची रीघ लागलेली आहे.

१0 कोटी रुपये किमतीच्या या गोलू बैलाची लांबी अंदाजे 15 फूट आहे. त्याची उंची सुमारे साडेपाच फूट आणि रुंदी साडेचार फूट आहे. गोलूला दररोज १० किलोपेक्षा जास्त चारा दिला जातो. एसी रूममध्ये त्याची राहण्याची व्यवस्था केली जाते. रोज पाच किलो सफरचंद, पाच किलो हरभरा आणि वीस किलो दूध असा त्याचा खुराक आहे. दररोज त्याची मालिश केली जाते. याचे मालक नरेंद्र सिंह यांच्या म्हणण्यानुसार गोलू-2 च्या सिमेनपासून हजारो म्हशींचा जन्म झाला आहे. यासाठी म्हशीचे मालक नरेंद्र सिंह यांना राष्ट्रपतींकडून पद्मश्री पुरस्कार ही मिळाला आहे.

गोलू-2 हा सहा वर्षाचा असून त्यांच्या कुटुंबातील ही तिसरी पिढी आहे. त्यांचे,आजोबा पहिल्या पिढीचे होते, त्याचे नाव गोलू होते. त्याचा मुलगा BC 448-1 याला गोलू-1 म्हणतात . गोलूचा हा नातू असून, त्याचे नाव गोलू-2 आहे.

Share Article:

व्हाट्स अँप वर सब्स्क्राइब करा .

© 2023-24 Marathisamwad.com