Want to Partnership with me? Book A Call

Popular Posts

Categories

Edit Template

कमी खर्चात फायदेशीर शेती; माहिती करून घ्या जांभूळ शेतीबद्दल

जांभूळ हे औषधी फळ असून ते अनेक रोंगावर गुणकारी आहे. सोडियम, मॅग्नेशियम, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी सारख्या पोषक तत्वांनी समृद्द असे हे फळ आपले आरोग्य निरोगी राखण्यास अतिशय उपयोगी आहे. मधुमेहावर हे एक रामबाण रामबाण औषध असून याच औषधी गुणधर्मामुळे या फळाची देशांत नाही, तर विदेशात सुद्धा मागणी वाढत आहे. शेतकरी सुद्धा जांभूळ शेतीकडे वळत असून आपले आर्थिक उत्पन्न वाढविताना दिसत आहे. तर या लेखात आपण जांभूळ शेतीविषयी माहिती घेऊ या.

जांभूळ हे भारत , पाकिस्तान , इंडोनेशिया आणि श्रीलंका येथे आढळणारे फळ असून एक सदाहरित उष्णकटिबंधीय वृक्ष आहे . हे म्यानमार , नेपाळ आणि अफगाणिस्तानसह दक्षिण आशियातील इतर भागात आढळते . मराठीमध्ये जांभुळ , बांगला मध्ये कालो जाम, तमिळ मध्ये नवर पाझम या नावाने ओळखले जाते. काही प्रजाती ह्या ३० मीटरपर्यंत वाढतात आणि सरासरी आयुष्य १०० वर्षापर्यंत असते.

जमिनीची निवड:

कोरडवाहू आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन योग्य राहील. मुरमाड जमीन पण चालून जाते. कमी खर्चात जास्त पीक देणारे हे फळ आहे. उन्हाळी आणि रब्बी हंगामात पाण्याची आवश्यकता कमी असते.

जांभूळ लागवड कशी करावी?

साधारणतः पावसात जांभळाच्या बियांची लागवड करावी. जात निवडताना “कोकण-बहाडोली” निवडावी. दापोली येथील ‘डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठा’ने ही जात विकसीत केली आहे. एका खड्डया मद्ये एकच बी पेरावे, आणि दोन खड्डया मधील अंतर पंधरा ते वीस फुटांचे असावे. कलमांची रोपं लावत असाल तर खड्डा हा १ X १ असावा. गरजेनुसार शेणखत, निंबोळी खताचा वापर करावा. ठिबक सिचन वापरून वीद्राव्य खत द्यावी.

झाडाला मार्च-एप्रिलमध्ये फुले येऊ लागतात. हा फळधारणेचा काळ असतो, यावेळी पाण्याची आवश्यकता असते, त्यामुळे ५ दिवसांनी पाण्याचा पुरवठा करावा.

बाजारपेठ:

योग्य ती प्रतवारी आणि पॅकिंग करून ऑनलाईन ऍमेझॉन, फ्लिपकार्ट वर योग्य दरात फळ विकता येतात. स्थानिक बाजारपेठ आणि मॉल मध्ये ही योग्य मागणी असते. १५० ते २५० रू किलो पर्यंत भाव हा सहज मिळतो . साधारणतः खर्च वजा करून एकरी वर्षाला ४ ते ५ लाख उत्पादन हमखास मिळू शकते.

Share Article:

व्हाट्स अँप वर सब्स्क्राइब करा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2023-24 Marathisamwad.com