Want to Partnership with me? Book A Call

Popular Posts

Categories

Edit Template

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने वाढविला अमृत कलश योजनेचा कालावधी

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने त्यांच्या ग्राहकांसाठी नवीन वर्षाला एक आनंदाची बातमी दिली आहे. अमृत कलश योजना जी स्टेट बँक ऑफ इंडिया तर्फे चालवली जाते, त्यामध्ये  31 मार्च 2024 पर्यंत गुंतवणूक करता येणार आहे.  

अमृत कलश योजना 

स्टेट बँक ऑफ इंडिया ने अमृत कलश ही 400 दिवसांसाठी विशेष एफडी योजना सुरु केली आहे. या योजनेत गुंतवणूकदारांना 7.60 टक्के दराने व्याज मिळते. 

गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2023 पर्यंत होती. आता बँकेने ही मुदत वाढवली असून पुढील वर्षी 31 मार्च 2024 पर्यंत वाढवली आहे. 

भारतीय नागरिक अमृत कलश स्पेशल स्कीममध्ये 400 दिवसांसाठी एफडी करू शकतो. योजनेत एफडी गुंतवुणकीवर मासिक, त्रैमासिक आणि सहामाही व्याज मिळते .अमृत कलशच्या मॅच्युरिटीवर टीडीएस कापला जातो आणि व्याजाचे पैसे ग्राहकाच्या खात्यात जमा केले जातात . एफडीमधील पैसे वेळेपूर्वी काढण्यासाठी बँक लागू दरापेक्षा दंड म्हणून 0.50 टक्के ते 1 टक्के कमी व्याजदर वजा करते.

सामान्य नागरिकांना 7.19 टक्के व्याज आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के व्याज बँकेमार्फत दिले जाते. ही योजना तुम्ही ऑनलाईन किंव्हा स्टेट बँक ऑफ इंडिया च्या कुठल्याही शाखेत जाऊन घेऊ शकता. गुंतवणूकदारांना बँक कर्ज सुविधा देखील देते. 

Share Article:

व्हाट्स अँप वर सब्स्क्राइब करा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2023-24 Marathisamwad.com